पावभाजी रेसीपी मराठी भाषेत | pavbhaji recipe in marathi

घरच्या घरी पावभाजी बनवा

स्वादिष्ट पावभाजी घरच्या घरी कशी करायची? मराठी भाषेत एकदम सोप्पा पद्धती मध्ये रेसिपी
Tasty Pavbhaji


साहित्य आणि कृती पुढीप्रमाणे:

पावभाजी बनवन्यासाठी लागनारे साहित्य:

  • २-३ बटाटे
  • ४-५ वाटण्याच्या शेंगा
  • १ टोमॅटो
  • १ कांदा
  • १-२ शिमला मिरची
  • आर्धा फुलकोबी
  • तेल
  • लसुण पेस्ट
  • चवीनुसार मीठ
  • लाल तिखट
  • पावभाजी मसाला
  • बटर
  • कोथिंबीर
  • लिंबू

आता आपण कृती पाहुया :– 

                                         सगळ्यात आधी आपल्याला कूकरच्या एका भांड्यामध्ये बटाटे व दुसऱ्या भांड्यामध्ये  फुलकोबी आणि शिमला मिर्ची कापून घ्यावी व त्याला धुवून कुकर मध्ये उकडायला टाकावे एक दहा मिनिटामध्ये गॅस बंद करून घ्यावा नंतर बटाटे सोलुन घ्यावेत व भाज्या बारीक क्रश करून घ्याव्यात आणि बटाटे खिसून घ्यावेत.
                   या नंतर भाजीला फोडणी देण्याकडे येऊया, सगळ्यात पहिलं एक स्टीलच भांड घ्यावे त्यामध्ये तेल ओतावे आणि जिरी–मोहरी ची फोडणी द्यावी. त्यानंतर बारीक कापलेला कांदा तेलात लाल होईपर्यंत परतावा त्यात टोमॅटो टाकावे त्यामध्ये लाल टिकत १-२ चमचा टाकावे व १ चमचा पावभाजी मसाला टाकावा, त्यानंतर चवीप्रमाणे मिट टाकावे आणि थोडी कोथंबीर टाकावी तेलामध्ये खिसलेला बटाटा आणि क्रश केलेली शिमला मिरची व 
वटाने कोबी टाकावी त्यामध्ये आधीच थोडे पाणी टाकावे आणि तेलामध्ये त्या भाज्या टाकाव्या, एकदा एकत्र केलेले मिश्रण व्यवस्थितपणे हलवून घ्यावे त्यानंतर भाजीमध्ये थोडेसे बटर घालावे आणि थोडेसे लिंबू पिळावे.
आणि ५ मिनिटानंतर गॅस बंद करावा, व पावाला बटर लावून पाव गरम करून घ्यावेत, व पावभाजी खाण्यास घ्यावी.

टिप्पणियाँ