खुशखुशित कोथिंबीर वडी ची रेसीपी | kothimbir vadi recipe marathi

खमंग खुशखुशित कोथिंबीर वडी ची सोपी रेसीपी

अनेक वेळा आपल्याला कोथिंबीर वडी खान्याची इच्छा होते पन प्रश्न येतो की बानवायची कशी? त्यासाठी मी आपल्यासाठी घेउन आली आहे  खमंग खुशखुशित कोथिंबीर वडी ची सोपी रेसीपी. या रेसीपी चा उपयोग करून तुम्ही घरच्या घरी कोथिंबीर वडी बनवू शकता चला तर मग सुरु करुया.

कोथिंबीर वडी बनवन्यासाठी चे साहित्य

  • कोथिंबीर १ पेंढी
  • बेसन पीठ १ वाटी
  • हिरवी मिरची २-३
  • लसूण पेस्ट
  • मीठ चवीप्रमाणे
  • हळद अर्धा चमचा
  • तेल
  • ओवा

 कोथिंबीर वडी बनवन्याची कृृृृती

कोथिंबीर नीट करून बारीक चिरून घ्यावी, त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी, धुवून झाल्यावर कोंथिबीर मधे बेसिन पीठ, लसूण पेस्ट, हिरवी मिरची, मीठ चवी नुसार, हळद ओवा घालून मळून घ्यावे. त्यानंतर त्याचे गोल गोल रोल करून घ्यावे.व कूकरच्या डब्ब्या मध्ये अथवा एका भांड्यामध्ये त्या वड्या एक साधारण १०-१५ मिनिट वाफलून घ्याव्या, ५-१० मिनिट थंड होऊ द्याव्या. आणि कापून घेऊन त्याच्या छोट्या छोट्या वड्या करून घ्याव्यात, एक भांड्यात तेल घावे, तेल गरम करून वड्या तळून घ्यावेत. जर तुम्हाला वाफेवरील तश्याच वड्या आवडतं असतील बिना तळता तर बिना तळता देखील खाऊ शकता, जसं तुम्हाला आवडत असतील तसे, खाऊ शकता.

कोथिंबीर वडी खाण्यासाठी तयार होतील.


टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें