घरच्या घरी गुलाब जामुन बनवा-मराठी मध्ये
गुलाब जामुन कोणाला आवडतं नाही; भारतात स्वीट डिश म्हंटलं की सगळ्यांना गुलाब जामुन आठवतो, आणि गुलाब जामुन म्हटलं की सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते, तर आपण आज गुलाब जामुन ची रेसिपी बघणार आहोत...!!
गुलाब जामुन बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
- १/२ कप मैदा
- चिमुटभर खायचा सोडा
- २५० ग्रॅम खावा/ रवा
- १.१/२ कप साखर
- ३/४ कप पाणी
- तेल
- इलायची पावडर
गुलाब जामुन करण्यासाठी ची कृती :
गुलाब जामुन सर्वप्रथम आपल्याला गुलाब जामुन बनवण्या साठी मैदा आणि खावा एकजीव करून घ्यावा,त्या नंतर त्याला एक १०-१५ मिनिट एका भांड्यामध्ये ठेऊन द्यावे नरम होण्यासाठी, त्या नंतर एका भांड्या मधे, २/३ कप पाणी टाकून गॅस वर ठेवावे त्यात साखर घालून विरघळू घ्यावी आणि त्या पाकाला एक उकळी येऊ द्यावी,आणि नंतर ४-५ मिनिट त्या पाकाला शिजू द्यावे, पाक तयार झाला असेल तर त्यात वेलची पूड घालून घ्या, हवं असेल तर केसर सुद्धा घालू शकता.
त्या नंतर मैदा आणि खव्याचे मिश्रण तयार करून ठेवलेले घ्यावे आणि त्याचे छोटे छोटे गोळे वळून घ्यावे साधारण एक लिंबू च्या आकाराचे,
२५० ग्रॅम खावा आणि १/२ कप मैद्याचे साधारण २०-२२ गुलाब जामुन बनवून होतात, त्या नंतर एक मंद आचेवर तेल गरम करून घ्यावे, जास्त तेल तर गरम झाले तर गुलाब जामुन वरून तळून निघतात आणि आतून कच्चे राहतात. त्यामुळे तेल मंद आचेवर गरम करून घ्यावे आणि गुलाब जामुन ३-४,३-४ हळू हळू तळून घ्यावेत, गुलाब जामुन तळून झाल्या नंतर पाका मधे टाकावे.१०-१५ मिनिटानंतर गुलाब जामुन पाका मधी मुरले की खाण्यासाठी तयार होतील...!
एक १०-१५ मिनिटांनी गुलाब जामुन खाण्यासाठी घेऊ शकता..!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें