वाचन कौशल्याचा विकास | Vachan kaushalyacha vikas

वाचन कौशल्याचा विकास

वाचन ही क्रिया तेवढी महत्वाची आहे की त्यासाठी लिहू वाचू तितकं कमीच आहे. थोडक्यात, वाचन म्हणजे मनाचा व्यायाम, बुध्दीला चालना, विचारांना खाद्य आणि सृजनशक्तीला गती मिळण्याची खात्रीशीर कृती. अजुन एक फायदा जो आपल्या इंग्लिश भाषा शिकवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे; तो म्हणजे आपला शब्दसंग्रह वाढेल. उच्चार दुरुस्त होतील, बोलने आणि लिहिणे या कौशल्याचा विकास होण्यासाठी बरीचशी मदत देखील होईल.


Reading habits
Reading


आपल्याला काही घटनांमुळे जादा कामामुळे शारीरिक किंवा मानसिक थकवा येण्याची शक्यता असते, काहींना तर नैराश्य देखील येऊ शकते. आशा वेळी पुस्तके ऊर्जा देतात, नवीन उमेद देतात, काम करण्याची प्रेरणा देखील देतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपले मनोरंजन होते. थकवा नैराश्य जणू गायब होऊन जाते.

"जी व्यक्ती चांगली पुस्तके वाचू शकत नाही ती व्यक्ती निरक्षर पेक्षा जास्त सरस असु शकत नाही"

विविध क्षेत्रातील, विविध विषयांवर पुस्तके उपलब्ध आहेत त्याच्या वाचनाने अनेक अडचणी दूर करून घेता येतात. शब्द संग्रह वाढवण्यासाठी, व्याकरण समजून घेण्यासाठी, उच्चार पडताळून पाहण्यासाठी, लिहायला शिकण्या पासून कलात्मक लेखकाला अवगत करण्यासाठी पुस्तके उपलब्ध आहेत. शब्दकोश,ज्ञानकोश आदींचा वापर अधिक अडचणींवर रामबाण उपाय म्हणून उपयुक्त ठरू शकतो.

नियमित वाचन केल्याने आपल्या बोलण्यात आत्मविश्वास निर्माण होतो, बोलने प्रभावी होते, नवीन नोकरी मिळवताना घेतल्या जाणाऱ्या गटचर्चा, मुलाखती, निर्णयक्षमता यासारख्या कौशल्याची जोपासना वाचनातून होते. लेखनकला समृध्द होते. कथा, काव्य, चरित्र, आत्मचरित्र वाचल्याने आपणास ही लेखनाची गोडी निर्माण होऊ लागते इंग्लिश भाशेतून लिहित असताना सगळ्यात मोठा अडसर निर्माण होतो तो म्हणजे स्पेलिंग चा वाचनामुळे यावर मात करता येते. वरचेवर वाचल्यामुळे एखादे स्पेलिंग चुकीचे आहे हे एका कटक्षात समजून येते.

वाचल्याने असुसंकृत व्यकी देखील सुसंस्कृत होतात. वाचकाच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होतात. इंग्लिश भाषेचे उदाहरणं घेतल्यास असे दिसून येते की या भाषेतील ज्ञानाचा झरा कधीच न आटणारा आहे. विविध विषयांतील इंग्लिश भाषेतील पुस्तकाच्या वाचनामुळे सुधारणा झाल्याशिवाय राहत नाही.
आशा प्रकारे status symbol असलेली English ही भाषा आत्मसत करण्याचे महत्त्वाचे आणि हमकास यश मिळवून देणारे साधन म्हणजे वाचन कौशल्य होय
वाचल्याने आपल्या ज्ञानात भर पडते, आपल्या बुध्दीचा देखील विकास होतो, माहितीचा भंडार वाढतो,
टिप्पणियाँ