फॅक्टरी
जंगलात वाघाची फॅक्टरी होती.
तिथ एकच मुंगी (सामान्य सेवक) काम करायची.
ती एकटी तिच्या वेळेप्रमाणे कामावर यायची दिवसाच काम संपवून निघून जायची .
ती एकटी तिच्या वेळेप्रमाणे कामावर यायची दिवसाच काम संपवून निघून जायची .
वाघाचाही बिझनेस बरा चालला होता.
वाघाने विचार केला कि...
ही एकटीच मुंगी कोणी तिच्यावर पाहणी न करता इतके चांगले काम करत असेल तर तिच्यावर पाहणी करणारा एखादा माणूस नेमला तर ती किती चांगला प्रतिसाद देईल
ही एकटीच मुंगी कोणी तिच्यावर पाहणी न करता इतके चांगले काम करत असेल तर तिच्यावर पाहणी करणारा एखादा माणूस नेमला तर ती किती चांगला प्रतिसाद देईल
या उद्देशाने वाघ त्याच्या फॅक्टरीत एका मधमाशीची Production Manager म्हणून नेमणूक करतो
मधमाशीला कामाचा भरपूर
अनूभव असतो. शिवाय ती रिपोर्ट लिहीण्यातही पटाईत असते.
अनूभव असतो. शिवाय ती रिपोर्ट लिहीण्यातही पटाईत असते.
ती वाघाला म्हणते
सर्व प्रथम हिच्या येण्या-जाण्याच्या वेळा फिक्स करा. आणि हे सगळ रेकॉर्ड ठेवायला आणि कामाचा वेग वाढवायला मलाएका सेक्रेटरीची गरज आहे
सर्व प्रथम हिच्या येण्या-जाण्याच्या वेळा फिक्स करा. आणि हे सगळ रेकॉर्ड ठेवायला आणि कामाचा वेग वाढवायला मलाएका सेक्रेटरीची गरज आहे
मग वाघ तिचा सेक्रेटरी म्हणून सश्याची नेमणूक करतो.
वाघ मधमाशीच काम पाहून खुप खुश होतो.
आणि म्हणतो आत्तापर्यंत झालेल्या कामाचा रिपोर्ट करा आणि मला त्याचा ग्राफ काढून Production Progress दाखवा.
मग त्यासाठी मधमाशी computer, projector आणि laser printer ची मागणी करते.
त्यासाठी वाघाला पुन्हा एका computer department सांभाळण्याठी एका computer head ची गरज भासते. म्हणून तो एका मांजराची हेड म्हणून नेमणूक करतो
कालांतराने मुंगीला ते सारखे सारखे काम सोडून ते रिपोर्ट तयार करत बसणे. वेळवर जाणे येणे हे बंधनकारक वाटते आणि प्रोडक्षन कमी होवू लागते.
मग वाघाच्या डोक्यात येते असा एक technical माणूस या दोघांच्या मध्ये आणला पाहिजे कि जो मधमाशीचे विचार मुंगीला व्यवस्थीत समजावून सांगेल.
म्हणून तो परत माकडाला technical instructor म्हणून नेमतो.
रोज मनात येईल तेवढच काम करणा-या आणि वेळेच्या आत घरी जाणा-या मुंगीला हे काही आवडत नाही.
तिला जास्तच राग येतो.मग वाघाचे production अजून घटते.
आपल्याला तोटा होतोय. याच कारण शोधायला वाघ घुबडाला पाठवतो.
3 महिन्याच्या सर्व्हेनंतर घुबड आपला रिपोर्ट पाठवतो
तुमच्याकडे कामगार वर्ग जास्त आहे तो कमी करा
"आता मला सांगा कोणाला कामावरून काढलं जाईल। ????
अर्थातच मुंगीला
......
......
तशीच व्यथा सर्व क्षेत्रात आज आहे काम करणाऱ्यावरच अन्याय होत असतो आणि "आयत्यावर कोयता मारणारे" मतलबी लोक मस्त आरामात जगतात हीच शोकांतिका आहे...
Right bro
जवाब देंहटाएंThanks for visiting
हटाएं